आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे सकारात्मक पाऊल:काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मोफत लसीकरणासाठी देणार आपले एका वर्षाचे मानधन

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसचे 53 आमदार आपले महिनाभराचे मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार

राज्यातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. दरम्यान आता राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत आहे. असे असताना आपले वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली आहे. यासोबतच मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचे एकमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. यामुळेच मी माझे वर्षभराचे मानधन राज्यासाठी देणार आहे. यासोबतच काँग्रेसचे 53 आमदार आपले महिनाभराचे मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सहकारी संस्थांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, मोफत लसीकरणाबाबत महाविकास महाविकास आघाडीचे एकमत आहे. तसेच मोफत लसीकरणासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही आग्रही आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र राज्यात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने 1 मेपासून राज्यात लसीकरण केले जाणार नसल्याचे राजेश टोपेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...