आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई काँग्रेसतर्फे अहिंसेच्या मार्गाने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मोर्चेकरी काॅंग्रेस नेते भाई जगताप, तुषार गांधी आणि राखी जाधव यांच्यासह शेकडो काॅंग्रेस कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी अटक केली.
अहिंसेच्या मार्गाने मोर्चा
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा, देशातील हुकुमशाही, भष्ट्राचारी केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात आणि लोकशाही वाचविण्यासाठी आज मुंबई काँग्रेसतर्फे अहिंसेच्या मार्गाने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता.
बहुतांश सर्वपक्षांचा पाठींबा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चामध्ये काँग्रेस सहित, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, जनता दल, जनता दल सेक्युलर, आरपीआय (गवई गट) तसेच इतर विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या मशाल मोर्चामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे माजी खासदार
मोठ्या नेत्यांचा सहभाग
संजय निरुपम, हुसेन दलवाई, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य, AICC चे महासचिव बी एम संदीप, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, शेकापचे राजू कोरडे, भारत बचाओ आंदोलनाचे अध्यक्ष फिरोज मिठीबोरवाला, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल, मुंबई काँग्रेसचे युवा नेते सुरजसिंह ठाकूर यांचा प्रमुख सहभाग होता. तसेच सर्व विरोधी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाकेबंदी, कार्यकर्त्यांना अटक
आज संपूर्ण दिवसभर मशाल मोर्चाला येणाऱ्या सर्व गाड्यांची नाकाबंदी करून दडपशाही पध्दतीने पोलिसांनी अडवणूक केली. शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यात काही नेत्यांचाही समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.