आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची बैठक:राज्यातील काँग्रेसमध्ये हालचाली, नाना पटोलेंना दिल्लीमधून बोलावणे; शुक्रवारी होणार महत्त्वाची बैठक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दरम्यान दिल्लीहून त्यांना तातडीचे बोलावणे आले आहे. त्यामुळे धुळ्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले आज दिल्लीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामुळेच नाना पटोले हे दिल्लीला रवाना होणार आहेत.

नाना पटोले यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर पासून ते जास्त सक्रिय झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वबळावरचा नाराही दिला आहे. सध्या नाना पटोले हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र, नानांना तातडीने दिल्लीचे बोलवन आल्याने ते आपला दौरा अर्धवट सोडून उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीत उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार, काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका याविषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...