आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:काँग्रेस मंत्र्यांची तीन सदस्यीय प्रभागास मंजुरी; कार्यकारिणीचा विरोधात ठराव, नाना पटोले यांना हवेत दोन प्रभाग

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थोरात-चव्हाणांना शह

मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस मंत्र्यांनी तीन सदस्यीय प्रभागास मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात-चव्हाण यांना या ठरावाद्वारे शह दिल्याचे मानण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मतभेतही चव्हाट्यावर आले आहेत.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय ठरावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यापूर्वी आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या चार बैठका पार पडल्या होत्या. बैठकीला काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते उपस्थित हाेते. प्रभाग रचनेवर तिन्ही पक्षांत एकमत होत नव्हते.

शेवटी तीन सदस्यांवर तोडगा निघाला.त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी प्रदेश काँग्रेसने कार्यकारिणी बैठकीत मंत्रिमंडळाच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. काँग्रेसची दोन सदस्यांची मागणी होती, सरकारने तीन सदस्यीय केला. अद्याप राज्यपालांची सही झालेली नाही, अध्यादेशाच्या प्रस्तावात बदल करावा, तसे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...