आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंत्र्यांना कोरोना:काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना कोरोनाची लागण, स्वतःला घरातच केले आयसोलेट; ट्विटरवरुन दिली माहिती

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार अस्लम शेख - फाइल फोटो
  • अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असून त्यांनी शहरातील अनेक हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत
Advertisement
Advertisement

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक राजकीय नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. काँग्रेस आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांनी स्वतःला घरातच आयसोलेट केले आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. अस्लम शेख यांनी कोरोना काळात मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत.

“मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंती देखील अस्लम शेख यांनी केली. “मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.” असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

यापूर्वी राज्यातील अनेक नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या तिन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. 

Advertisement
0