आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष:भाई जगताप यांची मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड, तर कार्यकारी अध्यक्षपदी चरणजीतसिंह सप्रा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कांग्रेस नेते आणि विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. विद्यमान मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षातील नाराजी वाढल्याची चर्चा होती.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड झाली. एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षातील नाराजी आणि लवकरच येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने हा बदल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चरणजीतसिंह सप्रा, अस्लम शेख, मिलिंद देवरा, संजय निरुपम, सुरेश शेट्टी अशा नेत्यांचीही नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.

दरम्यान, भाई जगताप यांच्यासोबतच मराठा काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, चरणजीतसिंह सप्रा यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच, माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समिती अध्यक्ष करण्यात आले असून सुरेश शेट्टी यांना मेनिफेस्टो कमेटीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...