आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशातील वक्तव्यावरुन टीकास्त्र:मोदीजी अजुन किती फेकणार? हद्द झाली राव! नाना पटोलेंचा पंतप्रधानांना बोचरा सवाल

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते असे मोदी म्हणाले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी ढाका येथे शुक्रवारी एक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर देशात राजकीय टीकेला सुरुवात झाली आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते असे मोदी म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही यावरुन मोदींना खोचक सवाल केला आहे.

'मोदीजी, अजुन किती फेकणार? आमच्या मराठीत एक म्हण आहे, हद्द झाली राव !,' असे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही आपल्या तोंडातून निघाला नाही आणि स्वातंत्र्याच्या बाता मारण्यासाठी बांगलादेशामध्ये गेला आहात? शेतकऱ्यांना तुम्हीच 'आंदोलनजीवी' म्हणाला होतात. मग आपण कोण आहात, 'ढोंगजीवी'? असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे. मोदी यांच्या बांगलादेशातील या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवली जात आहे.

काय म्हणाले होते मोदी?
बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. हे आंदोलन माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनामधील एक होते. त्या वेळी मी 20-22 वर्षांचा असेल. असे मोदी म्हणाले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचे फोटो पाहून अनेक दिवस आम्हाला झोपही लागलेली नव्हती. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल जी भावना बांगलादेशात होती, तितकीच ती भारतात असल्याचे मोदी शुक्रवारी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...