आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल:'वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलेय, तर राजभवन हे भाजपचे कार्यालय झालेय'

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजभवन हे भाजपचे कार्यालय झालेय

फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोले म्हणाले की, 'आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो. तसेच वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलेले आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवण्यात आला होता, आरएसएसची लोक कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती जण होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या विषयावर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारामध्ये गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. तसेच आम्ही देश विकून चालवत नव्हतो, काँग्रेसनेच देशाला उभे केले आहे.' असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे.

भाजपवाले कसा वाटा घेतात हे सर्व जनतेला माहिती आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, 'या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. मात्र आता देश विकून ते चालवणारी लोके काँग्रेसला वाट्याविषयी सांगत आहेत. तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झाले आहेत ते राज्य सरकारने उघडकीस आणावे. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे भाजपवाले वाटा कसा घेतात हे सर्व जनतेला ठाऊक माहिती आहे. याविषयी आम्ही विधानसभेत भूमिका मांडली असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

राजभवन हे भाजपचे कार्यालय झालेय
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. तसेच राजभवन हे आता भाजप कार्यालय झाले आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. मात्र महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेकाच भाजपने घेतला आहे. त्यासाठी जनता माफ करणार नाही' असा टोलाही पटोलेंनी भाजपला लगावला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?
'कॉंग्रेसचा कोणताही चेहरा उरलेला नाही, कोणतेही धोरण शिल्लक राहिलेले नाही. जे काही विषय समोर येत आहेत ते हे सिद्ध करतात की हे सरकार सत्तेत राहण्यासाठी काहीही करणार आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसला किती हिस्सा मिळत आहे असा माझा सवाल आहे. आम्ही राज्यपालांना या सर्व बाबींसंदर्भात चौकशी करण्यास सांगितले आहे.' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...