आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंचा हल्लाबोल:राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही, 'भारत जोडो यात्रे'मुळे धडकी भरली; देशाला मोदींसारखे फकीर लाभले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काँग्रेसची ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा 150 दिवस चालणार असून आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. "राहुल गांधींबद्दल भाजपचे भय संपत नाही..! 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे" अशी बोचरी टीका केली पटोले यांनी केली आहे.

काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. त्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर पलटवार करत राहुल गांधींच्या टीशर्टचा एक फोटो शेअर केला आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवर निशाणा साधला. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केला आहे. टीशर्टची किंमत 41,257 रुपये असल्याचा आरोप भाजपाने केला असून यावर जोरदार निशाणा साधत ‘भारत देखो’ असे म्हटले आहे. त्यावर आता नाना पटोलेंनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.

पटोलेंच्या ट्विटमध्ये काय?

नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "भाजपचे भय संपत नाही.! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपचे भय संपत नाही.! आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे 10 लाख रुपयांचा सुट परिधान करतात."

काँग्रेसचा पलटवार

"भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचे बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचे आहे का?" असे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...