आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर टीका:नाना पटोलेंचे नवे ट्विट, व्हिडिओ शेअर करत केली पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले- पंतप्रधानांना माफी मागावीच लागेल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन पंतप्रधान यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा असे म्हटले आहे. जनता दुःखात असताना राजा अहंकारात बुडाला होता असा उल्लेख त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.

नाना पटोले यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, 'आज उत्तर प्रदेशातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा या नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या बद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजपने माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन देखील सुरु केले होते.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देश टाळेबंदीचे पालन करत होते. दरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. काँग्रेसनेच लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असाच संदेश त्या नेत्यांनी दिला. काँग्रेसने लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि देशभरात कोरोना पसरला.' असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर केला होता.

बातम्या आणखी आहेत...