आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Congress, NCP And Shiv Sena Take This Decision Out Of Fear Of Scandal Coming Out, Kirit Somaiya's Attack On Thackeray Government Withdraws Permission To Cbi In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाकरे सरकारवर टीकास्त्र:काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला घोटाळे बाहेर येण्याची भीती म्हणून घेतला 'हा' निर्णय, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेता यावी यासाठी त्यांनी सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे.

राज्यातील कोणत्याही प्रकरणात तपासासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने आदेश जारी करून मागे घेतली आहे. आता सीबीआयला राज्यात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला घोटाळे बाहेर येण्याची भीती असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, 'सीबीआयला महाराष्ट्रात एन्ट्री नाही, असे ठाकरे सरकारने म्हटले आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हातात गेली तर सर्व बाहेर येईल, अशी त्यांना भीती वाटते, असे म्हणत भाजपच्या किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेता यावी यासाठी त्यांनी सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे. असा टोलाही सोमय्यांनी लगावला. तसेच सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोलले तर हे सरकार त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत असते. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.