आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक:मंठ्याचे राजेश राठोड, अंबाजोगाईच्या पापा मोदींना काँग्रेसकडून उमेदवारी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे राजीव सातव यांनी राजेश राठोड यांना उमेदवारी द्यावी अशी गळ घातली होती

काँग्रेसने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस सचिव मंठा-परतूरचे राजेश राठोड आणि बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच राज्यातील विधान परिषद निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता अंधुक झाली आहे.

राज्यात एकूण ९ जागांसाठी आता १० उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांना तर भाजपने ४ उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीने २ उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही २ उमेदवार दिले आहेत. राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे राजीव सातव यांनी राजेश राठोड यांना उमेदवारी द्यावी अशी गळ घातली होती.

बातम्या आणखी आहेत...