आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Congress Observed Farmers, Workers Save Day In The State Against Agriculture Bill; Two Crore Signatures Will Be Submitted To The President

कृषी विधेयकास विरोध:काँग्रेसने राज्यात पाळला किसान, मजदूर बचाओ दिन; दोन कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी सरकारने आणलेले शेतकरी- कामगारविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

मोदी सरकारने आणलेले शेतकरी- कामगारविरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने शुक्रवारी राज्यात ‘किसान-मजदूर बचाओ दिन’ पाळला. सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी आंदोलन करण्यात आले.

शेतकरी, कामगारविरोधी कायदे तातडीने रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमाने झाला. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँग मार्च काढण्यात आला. खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीत तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत आंदोलन झाले. नंदुरबार येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे आंदोलन केले. मुंबई, कोल्हापूर, सांगली येथेही आंदोलन झाले.