आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Congress On Shinde Fadnavis Government 'Mavia' Era Appointment Letter Given, Congress Accuses Shinde Fadnavis; Say This Government Is Canceling Recruitment

'मविआ' काळातील नियुक्तीपत्रे दिली:काँग्रेसचा शिंदे - फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणे - हे नोकर भरती रद्द करणारे सरकार

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या परीक्षांचे नियुक्तीपत्रे दिली, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा आरोप केला. शिंदे - फडणवीस सरकार नोकर भरती रद्द करणार असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

महासंकल्पावर आक्षेप

सध्या देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आहे. या वर्षी तब्बल ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प करण्यात आला. त्याच्या पहिल्या टप्प्यात आज जवळपास दोन हजार जणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांचा दृकश्राव्य संदेश ऐकवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यभरात विभागीय स्तरावर पालकमंत्री, मंत्री उपस्थित राहून त्यांनीही नियुक्तीपत्रे प्रदान केली.

तरुणांच्या जखमेवर मीठ

राज्य सरकारच्या या नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. तरुणांच्या या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

श्रेय लोटण्याचे काम...

लोंढे म्हणाले की, पंचाहत्तार हजार नोकऱ्या देऊ, बहात्तर हजारांची मेगा नोकर भरती करू, अशी गाजावाजा करून घोषणा करण्यात आली. मात्र, आता प्रत्यक्षात ज्या जिल्हा परिषदेच्या आणि इतर साडेतेरा हजारांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्याची भरती रद्द केली. अठरा हजार पोलिस भरतीची घोषणा केली. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी त्यावरही स्थगिती आली. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या म्हाडाच्या परीक्षा झाल्या होत्या, त्याचे नियुक्तीपत्र देत पुन्हा श्रेय लाटण्याचे काम हे भाजपकडून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...