आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:कसबा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीतील निकालाने आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या गुरुवारी झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत कसबा पेठची पोटनिवडणूक गांभीर्याने लढण्याबाबत चर्चा झाली. या मतदारसंघातून सहा इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून त्यांची नावे दिल्लीला पाठवून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या २६ फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या बैठकीत दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...