आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाडांचे कोरोनामुळे निधन

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रिपदही भुषवलेले होते. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीमध्ये राहत असत. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांसोबत त्यांची चांगली ओळख होते. काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी दलित चळवळीशीही ते जोडले गेलेले होते. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते.

बातम्या आणखी आहेत...