आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा भाजपवर निशाणा:​​​​​​​ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे फडणवीसांचे पाप, सचिन सावंतांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी राज्यातील एक हजार ठिकाणी भाजपने चक्काजाम आंदोलन केले.

राज्यात केल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला असतानाच आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपकडून राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात आली. राज्यातील एक हजार ठिकाणी भाजपने चक्काजाम आंदोलन केले. यावरुन आता भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी जोरदार टीका केली आहे.

शनिवारी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींची राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिले नाही तर, राजकीय संन्यास घेणार असल्याचे विधान केले. यावरुनच सचिन सावंतांनी निशाणा साधला आहे. सावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपचेच पाप आहे. अनेकदा आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या फडणवीसांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वासही बसणार नाही'

'दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या अध्यक्षांना व पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागितली होती. दोन वर्षे भाजप नेत्यांनी मागणी करुनही केंद्र सरकार ती देत नसेल, तर त्यात महाविकासआघाडी सरकारची चूक ती काय?' असा सवाल सचिन सावंतांनी उपस्थित केला आहे.

तसेच पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, 'अध्यादेश कोणी काढला? फडणवीस सरकार प्रभागरचना कोणी केली? फडणवीस सरकार औरंगाबाद व नागपूर खंडपीठाने स्थगिती कोणाच्या काळात दिली? फडणवीस सरकार ओबीसी जनगणनेच्या माहितीसाठी केंद्राला कोणी पत्र लिहिले? फडणवीस सरकार दोन वर्षं माहिती कोणी दिली नाही? मोदी सरकार मग महाविकास आघाडी सरकारची चूक ती काय?' असेही सचिन सावंत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...