आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुप्तेश्वर पांडेंवरुन फडणवीसांना काँग्रेसचा सल्ला:'...तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल', बिहार निवडणुकीवरुन काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना दिला सल्ला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिबापमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल यूनाइडेड (JDU) मध्ये गुप्तेश्वर पांडेंनी जाहीर प्रवेश केला आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये पांडेंनी प्रवेश केला आता ते निवडणुक लढवणार आहेत. दरम्यान बिहारचे भाजप प्रभारी हे देवेंद्र फडणवीस आहे. यावरुन काँग्रेसने फडणवीसांना एक इशारा तसेच सल्ला दिला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले की, देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल'

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन चर्चेत आले होते. त्यांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच मुंबई पोलिसांवर अनेक आरोपही केले होते. यावरुन प्रचंड गदारोळ झाला. यावेळी त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

बक्सर जिल्ह्यातून लढवू शकतात निवडणूक
राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल यूनाइडेड (JDU) मध्ये गुप्तेश्वर पांडेंनी जाहीर प्रवेश केला आहे. गुप्तेश्वर पांडे यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी झाला. राजकीय इनिंग सुरू करण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच डीजीपी पदाचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती (वीआरएस) घेतली होती. गुप्तेश्वर पांडे बक्सर जिल्ह्यातून निवडणूक लढवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...