आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पष्टीकरण:'अपूर्ण माहितीच्या आधारे अग्रलेख लिहीला, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा - बाळासाहेब थोरात

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामनातून अशोच चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाना साधण्यात आला

'आमच्या भेटीनंतर सामनाने पुन्हा अग्रलेख लिहावा,' असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्याचा आरोप काँग्रेस केला. त्यातच या नाराजीवरुन सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे काढण्यात आले. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट आणि 'सामना'तील अग्रलेखावर भाष्य केले.

माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'आम्ही भक्कमपणे आघाडी सरकारसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचे समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय. कोणत्याही बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे. त्यासाठी आम्ही बैठक मागत आहोत. खाटेचं कुरकुरणं आधी ऐकून तर घ्यावं, ते ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे समाधान होईल.'

बातम्या आणखी आहेत...