आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून बदनामीचे काम सुरू:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपवर निशाणा; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली अनेक दिवस राज्यात जे राजकारण सुरू आहे. ते केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षंडयंत्र भाजपकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रातील हनुमान चालिसा आंदोलन आणि लाऊडस्पीकरवरील गोंधळावरून त्यांनी भाजप आणि राज ठाकरेंना टोला लगावला आहे. यामुळे राज्यातील गुतंवणुकीवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे हा तमाशा बंद करावा असा इशारा काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष यांनी दिला आहे.

घटनेने सर्वांना आपले सण उत्सव साजरे करण्याचा अधिकार दिला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात कुणाला धार्मिक गोष्टीपासून रोखू शकत नाही. आणि त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि कुणाला कायदा हातात घेता येणार नाही. कोणत्याही धार्मिक गोष्टींवरून वातावरण दुषित करण्याचे काम करू नये, भोंग्यावर सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे, त्यावर राज्य सरकार योग्य भूममिका घेईल असे म्हटले आहे.

राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम सुरू
राज्यात भाजपकडून अस्थिरता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून तरुणांची डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. आणि यातून रोजगाराला खिळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकार त्यांचे अपयश लपवण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे परंतू दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...