आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:पटोलेंची मंत्रिपदाची मागणी; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच, नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसह नेतेही नाराज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यांच्या निवडीची घोषणा होणार, इतक्यात पटोले यांनी अध्यक्षपदासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली. परिणामी, नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा पक्षश्रेष्ठींनी थंड बस्त्यात टाकल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद अन् विधिमंडळ नेतेपद अशी तिहेरी जबाबदारी आहे. परिणामी राज्य प्रभारी यांना पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे. त्यात पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद त्यागून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची स्वत:हून मागणी केली. कुणबी, विदर्भ नेता अन् धडाकेबाज स्वभाव म्हणून पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित झाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यास मंजुरीसुद्धा दिली. आश्चर्य म्हणजे पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद मागितले आहे. पटोले यांच्या नव्या मागणीने पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...