आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात 8 शार्प शूटर्सनी मिळुन मुसेवालाची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालाच्या शूटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.
संतोष जाधव याला खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा सौरभ महाकाळही आला होता. गवळी सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात आहे. या नव्या खुलाशानंतर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचे आदान-प्रदान केले असून या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पंजाब पोलिसांनी सहकार्यही मागितले आहे.
आतापर्यंत लॉरेन्स गँगचेच नाव पुढे
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी पटवली 8 शार्प शूटर्सची ओळख
मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 राज्यांतील 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील जगरूपसिंग रूपा व मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी व मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जाधव व सौरव महाकाल, सीकर, राजस्थान, भटिंडा, पंजाब येथील सुभाष बानुदा, हरकमल सिंग राणू यांचा समावेश आहे.
29 मे ची सायंकाळी मुसेवालासाठी अखेरची
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची रविवारी, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या. त्यापैकी 7 गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या. गोळी झाडल्यानंतर 15 मिनिटांत मुसेवालाचा मृत्यू झाला. बोलेरो आणि कोरोला वाहनांनी पाठलाग केल्याने थार जीपमधून जात असलेल्या मुसेवाला याचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यावेळी मुसेवाला यांच्यासोबत एकही बंदूकधारी नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.