आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाबाधितांची संध्या आटोक्यात येत आहे. तसेच कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या ही हजारांच्या खाली आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासदायक बाब आहे. सध्या राज्यात 965 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिल 2020 नंतर प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या इतक्या खाली गेली आहे.
राज्यातील कोरोनाची साथ झपाटयाने ओसरत असून आता रोजची रुग्णसंख्या दीडशेच्या खाली गेली आहे. या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी राज्यात 139 रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पहिली आणि दुसरी लाट ओसरली तरी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली कधीच गेलेली नव्हती. सर्वाधिक 258 उपचाराधीन रुग्ण मुंबईत, तर त्या खालोखाल पुण्यात 240 आणि ठाण्यामध्ये 149 रुग्ण आहेत. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या 100 च्या खालीच आहे.
मुंबईत 54 नव्या रुग्णांची नोंद
मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. गुरुवारी मुंबईत 54 नवे रुग्ण आढळले असून एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. नव्याने आढळलेल्या 54 रुग्णांपैकी केवळ चार कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या रुग्णालयात केवळ 27 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
हे जिल्हे करोनामुक्त
रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा हे जिल्हे कोरोनामुक्त झाले असून या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
पाचपेक्षाही कमी रुग्ण असलेले जिल्हे
सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, जालना, उस्मानाबाद, अकोला, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाचपेक्षाही कमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.