आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:सुशांत आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राविरोधात कारस्थान, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी तपास लांबवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कान उपटले

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयडे जाणे हा मुंबई पोलिसांचा अपमान असून विरोधकांनी महाराष्ट्राविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप राऊत यांनी केला.

आज प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत म्हणतात, ‘मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची मागणी करते, केंद्र सरकार त्यास लगेच मान्यता देते. एखाद्या प्रकरणाचे राजकारण करायचे, त्यासाठी सीबीआय-ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करायचा हे सर्व धक्कादायक आहे.’मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो ‘सीबीआय’कडे द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व २४ तासांत ती मागणी मान्यदेखील झाली. सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल.’ ‘मुंबई पोलिसांनीच २६/११ चा दहशतवादी हल्ला परतावून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकावले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआयसारख्या संस्थांवर गेल्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे प्रश्न निर्माण करणाऱ्यांत नरेंद्र मोदी व अमित शहासुद्धा होतेच.या सर्व प्रकरणाचे सरळ सरळ राजकारण सुरू आहे असे ते म्हणाले.

पोलिसांनी तपास लांबवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कान उपटले

मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणाचा तपास नको इतका लांबवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राऊत यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवले गेल्याने सत्ताधारी शिवसेनेत अस्वस्थता आहे.

बातम्या आणखी आहेत...