आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी गोळीबार केला नाही:शिंदे गटाचे आ. सदा सरवणकरांचा दावा; म्हणाले - विरोधकांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''दादरमध्ये झालेल्या वादानंतर मी गोळीबार केला नाही. विरोधकांनी पोलिसांवर दबाव टाकत माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला बदनाम करण्याचा आणि माझे विकास कामे थांबवण्याचे हा कट आहे.'' असा दावा सदा सरवणकर यांनी आज माध्यमांसमोर केला.

सदा सरवणकर म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करतो. मला बदनाम करण्याचा कट आहे. समोरच्या लोकांकडे काम करण्यासाठी आणि सांगण्यासाठी काहीच नाही. मला विकास कामांपासून थांबवण्याचा माझे काम थांबवण्याचा हा प्रकार आहे. माझे कामे गल्लीबोळात दिसतील. मला पिस्तूलचे लायसन आहे, माझ्याकडे पिस्तूलचे लायसन आहे, पण स्टेनगणवाली सुरक्षा आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही.

आम्ही सर्व एकत्र नांदलेलो

सदा सरवणकर म्हणाले, पोलिसांनी जो गुन्हा माझ्यावर दाखल केला तो प्रेशर आणून गुन्हा दाखल करत असतील तर ते योग्य नाही. चाळीस ते पन्नासजण घेऊन महेश सावंत, संतोष तेलवणेला मारत असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही प्रभादेवी चौकात गेलो. महेशबाबत विचारणा केली पण महेश आणि आम्ही लहानचे मोठे एकत्र झालो आहोत, आमचा उद्रेक करण्याचा नाही तर प्रकरण शांत करण्याचा उद्देश होता.

सणासुदीला भांडणे नको

सदा सरवणकर म्हणाले, मी गेलो तेव्हा घटनास्थळी पोलिस अधिकारी होते. पोलिस आपले काम करतील. अशा प्रकारची सणासुदीला समाजात भांडणे करू नये. आम्ही वर्षांनुवर्षे सोबत होतो अशा प्रकारची भांडणे करणे योग्य नाही. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर मी निश्चित जाईल. मी पुन्हा सांगतो की, जे नावे घेतली जात आहेत ते आणि आम्ही सर्व लहानचे मोठे एकत्र झालो आहेत.

मला बदनाम करण्याचे कारस्थान

सदा सरवणकर म्हणाले, गोळीबार बिलकुल झाला नाही. अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही. या घटनेला वेगळे स्वरुप होण्याचे काम होत आहे. मला कामाला कुणीच संपवू शकत नाही. आज सकाळी बसलो तेव्हा दहा कामांची उद्गघाटने घेऊन बसलो होतो. मला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आपण कामाने जिंकू मने जिंकू, एकत्र उत्साहात सण , उत्सव साजरे करूया हाच उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे.

पोलिसांवर त्यांनी दबाव टाकला

पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल केला गेला असा आरोपही सदा सरवणकर यांनी केला. दादर येथील शांततेची स्थिती अशीच राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहे. एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्याचे सांगितले त्यामुळे दिला आहे. याच मुद्द्यावरुन मला टार्गेट करण्याचा उद्देश असू शकतो असेही सरवणकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...