आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार:हिंदूंमध्ये फूट पाडून स्थानिक अस्मिता चिरडण्याचे कारस्थान, जे. पी. नड्डांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे उत्तर

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष दडपशाही करत आहे. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली. नड्डा म्हणाले, पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूंत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचे कारस्थान भेसूर आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोवती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फास आवळला आहे. राऊत यांना रविवारी रात्री अटक झाल्यानंतर ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री येथे पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले की, ‘संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, असे ते म्हणाले. राजकारणात बुद्धी दिसत नाही तर फक्त बळ दिसते. हे सध्या सत्तेच्या हमामात आहेत. सत्तेचा फेस उतरला की सगळे स्पष्ट होईल’, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

नड्डांचे वक्तव्य ठाकरेंसाठी : फडणवीस
‘आगामी काळात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील.’ या जेपी नड्डांच्या वक्तव्यावरून भाजप बॅकफुटवर आला आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील भाजप सरकारचीही यामुळे कोंडी झाली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नड्डा यांचे ते वक्तव्य ठाकरेंसाठी होते.

‘दडपशाहीचे राजकारण’
भाजपकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आराेप करून ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धात हिटलर जिंकेल असे वाटत होते. त्या वेळी डेव्हिड लो व्यंगचित्र काढायचा. या व्यंगचित्रांमुळे हिटलर नामोहरम झाला होता. हा माणूस कोण आहे, त्याला घेऊन या असे आदेशच हिटलरने दिले होते. तेच आज देशात चालले आहे. संजय राऊतांच्या अटकेवर ते म्हणाले की, जरा कोणी बोलले तर त्याला दमदाटी केली जात आहे. बऱ्या बोलाने किंवा लोभाने आला नाही तर त्याला अडकवून टाकायचे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक आणि सर्व गोष्टी पाहिल्यावर मला गडकरींसारखे वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...