आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:12 रिक्त जागांमुळे संविधानिक पेच : नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांच्या नावाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण झाला आहे. हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे, असा दावा नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला.

आपण विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या. पण चार महिने झाले. राज्यपालांनी मंजुरी दिली नसल्याने समित्यांवरची १२ सदस्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे सध्या जे कामकाज सुरू आहे ते संविधानिक आहे की असंविधानिक आहे, असा प्रश्न पटोले यांनी या वेळी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...