आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागेची टंचाई असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्रे विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी माहे ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतलेली आहेत. भव्यता फाउंडेशन यांनी यापूर्वी ५ अंगणवाडी केंद्रे दत्तक घेतली असून एकूण ४० अंगणवाडी केंद्रे दत्तक घेतली आहेत. यामध्ये नाशिक-५, पालघर -५, गडचिरोली-९, चंद्रपूर-१, धुळे-१, नंदुरबार- १, छत्रपती संभाजीनगर - १५, रायगड-२, रत्नागिरी-१ यांचा समावेश आहे.
विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा, कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. शिंदे म्हणाले, कंटेनर अंगणवाडीप्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेंतर्गत सुविधायुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत असून बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे. यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. फडणवीस म्हणाले, मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली असून अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
महिला व बालविकास विभागामार्फत अनाेखा उपक्रम, बालकांसह पालकांची होणार सोय कंटेनर अंगणवाडीत { मुलांसाठी सर्व साहित्य { बुद्धिमत्ता वाढणारे खेळ { अत्याधुनिक टीव्ही { अभ्यासाचे सर्व साहित्य
२४९ रिकाम्या जागा कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आलेल्या आहेत. पहिला कंटेनर बालविकास प्रकल्प, वरळी, कांदिवली येथील अंगणवाडी क्र.१०५ पांडे कंपाउंड, जानुपाडा, कांदिवली- पूर्व या ठिकाणी आस्थापित करण्यात येऊन त्याचे ऑनलाइन उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.