आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:धनगर समाजाची दोन्ही सरकारांकडून अवहेलना, एक हजार कोटींची घोषणा मिळाले केवळ 51 कोटी : धनंजय मुंडे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फडणवीस सरकारने एक हजार कोटींची घोषणा केली, पण आचारसंहितेमुळे एक रुपयाही मंजूर होऊ शकला नाही. महाविकास आघाडी सरकारने ५१ कोटी रुपये मंजूर केले, पण कोविडच्या खर्चामुळे त्यांनीही एक रुपया दिला नाही. ही धनगर समाजाच्या विकास योजनांची विदारक स्थिती शुक्रवारी विधान परिषदेत पुढे आली. निमित्त होते धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत उपस्थित प्रश्नाचे. टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासाठी तीन वर्षे आणि नंतरचे दीड वर्ष अशी साडेचार वर्षे रखडलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न कधी निकालात लागणार, हा प्रश्न आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केला. आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने तोपर्यंत काय उपाययोजना करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्या वेळी हे चित्र समोर आले.

मुंडेंच्या उत्तरावर पडळकरांसह भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी : तत्कालीन भाजप सरकारने धनगर समाजाच्या १३ विकास योजनांसाठी १ हजार कोटी रुपयांचा शासन निर्णय घेतला होता. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने तो अमलात आला नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात मंजूर ५१ कोटी रुपये कोविडच्या संकटामुळे खर्च करता आले नसल्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मांडताच गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये धाव घेऊन घोषणाबाजी केली. अखेरीस मागील निर्णयाप्रमाणे धनगर समाजाला आदिवासी विकास योजनांप्रमाणे १३ योजनांसाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यानी विधान परिषदेत दिले. त्यानंतर विरोधी पक्षातील नेते व आमदार शांत झाले आणि पुढील कामकाज सुरू झाले. मात्र, बराच वेळ गाेंधळ सुरू होता. दरम्यान, या चर्चेमध्ये काही सदस्यांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...