आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींशी लढण्यासाठी उद्धव सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्रित शक्ती पणाला लावली आहे. या तिन्ही पक्षांचे नेते ‘वज्रमूठ’ आवळून जाहीर सभा घेत आहेत. असे असले तरी तिन्ही पक्षांत काही मुद्द्यांवरून असलेले मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी विरोध करत त्यांना जाहीर इशारा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गांधींनी अशी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला दिला होता. मित्रपक्षांची ही भूमिका काँग्रेस नेत्यांना आवडलेली नाही. यातूनच ‘मविआ’च्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे मोदींच्या पदवीवरून रान उठवणाऱ्या उद्धव सेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी त्यांना फटकारले आहे.
आघाडीच्या नेत्यांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी
मोदी शिकले त्या कॉलेजला त्यांचा अभिमान नाही काय ?
पंतप्रधानांची पदवी विचारली तर २५ हजार दंड होतो. मोदी जिथे शिकले त्या कॉलेजला त्यांच्याबद्दल अभिमान का वाटू नये? हल्ली डॉक्टरेट विकत घेता येते. काही जण तर पाण्याचे इंजेक्शन घेऊन फिरत आहेत.'
- उद्धव ठाकरे, मविआच्या सभेतून
राष्ट्रपतींना शैक्षणिक पात्रता विचारतात, मोदींना का नाही?
मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकला, राज्यशास्त्रात एमए केले. त्यांची पदवी एेतिहासिकच आहे. ती
नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर लावायला हवी. आपल्या देशात राष्ट्रपती-न्यायमूर्तींना शैक्षणिक पात्रता विचारली जाते, मग पंतप्रधानांची का लपवली जाते? मोदींनी स्वत:हून याबाबत माहिती द्यावी.
- संजय राऊत, खासदार उद्धव सेना
पंतप्रधानांची निवड बहुमतावर होते, शैक्षणिक पात्रतेवर नव्हे
पंतप्रधानांच्या पदवीचा विषय काढून आपण देशाला मागे नेत आहोत. त्यापेक्षाही महागाई, बेरोजगारी असे अनेक गंभीर व महत्त्वाचे विषय आहेत. त्याबद्दल कुणी चर्चा करायची नाही का? मोदींनी २०१४ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वत:चा करिष्मा निर्माण केला, जे भाजपला जमले नाही ते त्यांनी तेव्हा करून दाखवले. म्हणून ते सर्वोच्च पदावर आहेत. आपल्या लोकशाहीत बहुमताच्या आधारेच पंतप्रधान, मुख्यमंत्रिपदी निवड केली जाते, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नव्हे. मग तो विषय कशाला वारंवार काढता?
- अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.