आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला का?:शिवरायांवरील वक्तव्यानंतर आव्हाड सुधांशू त्रिवेदींवर बरसले, कोश्यारींना टोला

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली'' असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले. यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का?असा जळजळीत सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला विचारला. ते एका वृत्तवाहिनीशी आज बोलत होते.

दुप्पट किल्ले जिंकले

आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात एकच तह झाला. हा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झाला होता. तहातील वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तेथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून जिंकले होते.

राज्यपालांचा घेतला समाचार

राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला वाटते शिवरायांबद्दल वक्तव्य करून जाणून बुजून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचे काम केले जात आहे. राज्यपालांना वरच्यांचा (दिल्ली) आशिर्वाद आहे.

आता तरी जागे व्हा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्र घडवणारे, महिलांना शिक्षण देणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांनी वक्तव्य केली होती. काल शिवाजी महाराजांबद्दलही वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला, ते संदेश देत आहेत की, महाराष्ट्राचे लोक माझे काहीही बिघडवू शकत नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेने जागे व्हावे, लक्षात घ्यावे. आम्ही तर छत्रपती शिवरायांसाठी खोट्या केसेस अंगावर घेऊन लढत आहोत.

सूर्य, चंद्र, तोपर्यंत शिवरायांचे नाव

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपला स्वाभीमान लाथाडला जातो. शिवराय झाले, महात्मा फुले झाले आता काय तुमच्या बापापर्यंत येईपर्यंत वाट बघायची का? हे तर आपले मायबाप आहे ना..जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत शिवरायांचे नाव या भुतलावावरून कुणीही मिटवू शकत नाही.

तर कठीणच..

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसं नसतील तर कठीण आहे.

खोटा आणि खोटाच

जितेंद्र आव्हाड म्हणाले, हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास सांगण्यात आला. या चित्रपटात खोटा इतिहास आहे, असे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज म्हणाले आहेत. तो चित्रपट पाहायला कोणीही जात नाहीये. मात्र अजूनही महाराष्ट्र शासन झोपले आहे. महाराष्ट्रात आता सर्वकाही चालत आहे.

बातम्या आणखी आहेत...