आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पीय अधिवेशन:अधिवेशन दीड आठवड्याचे, कामकाज आठ दिवस, अर्थसंकल्प 8 मार्च रोजी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भ्रष्टाचार बाहेर पडण्याची भीती म्हणून सरकारचा पळ - देवेंद्र फडणवीस

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च असे दीड आठवड्याचे होणार असून त्यात आठ दिवसच कामकाज होईल. दि. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. गुरुवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

अनेक मंत्री सध्या कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर दीड आठवड्याचे अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे. विरोधकांनी बैठकीतून सभात्याग केला नाही. जेव्हा विरोधक बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगत होते, तेव्हा बैठक संपली होती, असा दावा अॅड. परब यांनी केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पकाळाच्या अधिवेशनावर टीका केली. ते म्हणाले, सरकार कोरोनाचे कारण दाखवून चर्चेतून पळ काढत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन घ्यायचे हे सरकार ठरवूनच आले होते. आपला भ्रष्टाचार बाहेर निघेल अशी सरकारला भीती आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच अल्प काळाच्या अधिवेशनाला विरोध करत बैठकीतून सभात्याग केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर अल्प काळाचे अधिवेशन घ्यायचे आहे तर लेखानुदान घ्या. अर्थसंकल्प नंतर मांडा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. अधिवेशनातून पळ काढण्यासाठी सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोना वाढल्याचा दावा करत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

कार्यक्रम पत्रिका : १ मार्च राज्यपाल अभिभाषण, पुरवणी मागण्या व शोक प्रस्ताव. २ मार्च सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव, अभिभाषणावर चर्चा. ३ शासकीय कामकाज. ४ मार्च विरोधी पक्षाचा प्रस्ताव. पुरवणी मागण्यांवर चर्चा. ५ मार्च पुरवणी विनियोजन विधेयक. अशासकीय कामकाज. ८ मार्च अर्थसंकल्प सादर. दुपारी २.०० वाजता. ९ मार्च शासकीय कामकाज. १० मार्च सर्वसाधारण चर्चा. अधिवेशनाचा शेवटचा दिवस.

बातम्या आणखी आहेत...