आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याचे रक्षक झाले भक्षक:भाईंदरमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिलेवर अत्याचार, आरोपी पोलिस जेरबंद

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वादानंतर भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर त्याच पोलिस ठाण्यातील हवालदाराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हवालदार बाळासाहेब ढोले याला अटक केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
27 वर्षीय पीडित महिला घरात पतीसोबत वाद झाल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी नवघर पोलिस ठाण्यात गेली होती. यावेळी आरोपी हवालदार बाळासाहेब ढोले याने पीडित महिलेला नवऱ्यासोबतचा वाद मिटवून देण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. आणि तिला धारावी मंदीर परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला घरच्यांशी ओळख करून देतो असे सांगून राहत्या घरी नेले आणि बळजबरी केल्याचा आरोप महिलेना केला आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक
नवघर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी हवालदाराला अटक केली आहे. दरम्यान कायद्याच्या रक्षकानेच भक्षकासारखे वागल्यामुळे सामान्य लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा असा प्रश्न सध्या परिसरात विचारला जात आहे.

नवघर पोलिस ठाण्यात मागील वर्षी ही घडला होता असा प्रकार
मे 2021 मध्येही नवघर पोलिस स्थानकातील पोलिसांने महिला पोलिसावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपाई कर्मचाऱ्याने सहकारी महिला शिपाई कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मागील वर्षीही घडला होता. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवघर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई पदावर कार्यरत असणारे प्रेम सागर वाघ याने सहकारी शिपाई महिलेवर काही वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पोलिस शिपाई धमकावून अत्याचार करत असल्याचा आरोप महिला पोलिसाने केला होता. यानंतर पीडित शिपाई महिलेच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात वाघ याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...