आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Analysis In Maharashtra : Corona Cases In Maharashtra Mumbai Pune Ahmadnagar Nagpur Aurangabad Latur Yavatmal Nashik Jalgaon Latest Today News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर:16 दिवसांत 10 पटीने वाढली संक्रमितांची संख्या, 70% रुग्ण 50 पेक्षा कमी वयाचे; 3 हजार पार गेला कोरोनाग्रस्तांचा आकडा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
धारावीमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर येथे घरोघरी जाऊन स्क्रीनिंग केले जात आहे. - Divya Marathi
धारावीमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर येथे घरोघरी जाऊन स्क्रीनिंग केले जात आहे.
  • राज्यात कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण 9 मार्च रोजी पुण्यात समोर आले होते
  • 31 मार्चपर्यंत राज्यात संक्रमितांची संख्या केवळ 302 वर पोहोचली होती.

देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्यात गुरुवारी कोरोना संसर्गांचे 165 नवीन रुग्ण समोर आले. यासोबतच राज्यातील संक्रमितांची संख्या तीन हजारांचा आकडा पार करत 3,081 वर पोहोचली आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई सबअर्बन, नाशिक शहरांचा समावेश आहे.  

महाराष्ट्रात 16 दिवसांत 10 पटीने प्रकरणे वाढली

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे गेल्या 15 दिवसांत 10 पटीने वाढली आहेत. राज्यातील कोरोनाचे पहिले प्रकरण 9 मार्च रोजी पुण्यात समोर आले होते. येथे एका कुटुंबातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. यानंतर 31 मार्च रोजी (21 दिवसांनंतर) संक्रमितांची संख्या 302 वर पोहोचली होती. या 21 दिवसांत दिवसांत एका दिवसात जास्तीत जास्त 27 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मात्र 1 एप्रिल ते 16 एप्रिल या 16 दिवसांत संक्रमितांची संख्या 10 पटीने वाढत आकडा तीन हजारच्या पार पोहोचला. यामध्ये 14 एप्रिल रोजी सर्वाधिक 350 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 

या आलेखातून, प्रकरणाची गती समजून घ्या

कोरोनाचे 70% रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

आरोग्य विभागाने राज्यातील 2330 संक्रमित रुग्णांचे विश्लेषण केले आहे. यांपैकी 70 टक्के म्हणजेच 1646 रुग्ण 21 ते 50 वर्षांच्या वयातील असल्याचे समोर आले. तर 684 रुग्णांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. या विश्लेषणातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, 50 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. आकडेवारीनुसार (14 एप्रिलपर्यंत झालेल्या एकूण 178 मृत्यूंपैकी) या वयोगटातील मृतांची संख्या जवळपास 77% आहे. दरम्यान राज्यात गुरुवारपर्यंत कोरोनामुळे 188 लोकांचा मृत्यू झाला आहे.  

जास्त तपासण्या केल्या, त्यामुळे वेगाने प्रकरणे समोर आली

महाराष्ट्रात संक्रमित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण राज्यात होणाऱ्या जलद तपासणी आहे. राज्यात आतापर्यंत 24 हजार पेक्षा अधिक सँपल घेण्यात आले आहेत. सोबतच मुंबईतील धारावीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर जवळपास साडेसात लाख लोकांची स्क्रीनिंग केली जात आहे. राज्य सरकार सध्या रॅपिड टेस्टिंगची तयारी करत आहे. लवकरच राज्यात रॅपिड टेस्टिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी राज्य सरकारने परदेशातून किट मागवल्या आहेत. यानंतर तपासाची गतीही वाढेल.

बातम्या आणखी आहेत...