आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड सेंटरला आग:वसई विरारच्या कोविड सेंटरमध्ये भीषण आग, ICU मध्ये दाखल 15 मधील 13 रुग्णांचा मृत्यू; रुग्णालयात 90 रुग्णांवर सुरू होते उपचार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी घडली.

पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड सेंटरच्या अतिदक्षा विभागाला (ICU) आग लागल्याने 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. या घटनेदरम्यान आयसीयूमध्ये 15 आणि संपूर्ण रुग्णालयात 90 रुग्ण उपचार घेत होते. यापैकी ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या 21 रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी घडली. आगीवर एक तासामध्ये नियंत्रण मिळवण्यात आले असून, आगीचे कारण AC मध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात यावेळी 15 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांचा आरोप - आग लागल्यावर स्टाफ रुग्णांना सोडून पळून आला
रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, ही आग लागली तेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ रुग्णांना आत सोडून बाहेर पळाला होता. अशा वेळी त्यांनी स्वतः आत जाऊन रुग्णांना काढण्याचा प्रयत्न केला होता. असे बोलले जात आहे की, या घटनेवळी ICU मध्ये दोन नर्स उपस्थित होत्या. तर रुग्णालयाचे CEO दिलीप शाह यांनी दावा केला की, रात्री रुग्णालयात डॉक्टर होते. मात्र त्यांना विचारले की, दुर्घटनेवेळी एकूण किती स्टाफ ड्यूटीवर होता ते योग्य आकडा सांगू शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...