आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव 2020:यंदा मुंबईकरांना समुद्रात करता येणार नाही बाप्पांचे विसर्जन, तर पुण्यातही घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोनाचा धोका हा कमी होत नाहीये. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशात आता विविध सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. लवकरच बाप्पांचे आगमण होणार आहे. मात्र यंदा कोरोनाचा धोका पाहता गणेश उत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. गणपती विसर्जनासाठी मुंबई आणि पुणे महापालिकेने विशेष आवाहान केले आहे.

मुंबईकरांसाठी कृत्रिम तलाव
दर वर्षी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पांचे समुद्रात विसर्जन केले जाते. मुंबईत गिरगाव आणि दादर चौपाटीवर सार्वजनिक मंडळांच्या सर्वाधिक गणपतींचे विसर्जन होते. मोठमोठ्या मिरवणुका निघतात. मात्र यंदा मुंबईकरांना बाप्पांचे विसर्जन समुद्रात करता येणार नाहीत. दादर चौपाटीवरील सावरकर मार्गावर बॅरिकेड लावून समुद्राकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कोरोनाचा धोका पाहता कृत्रिम तलावांची संख्या ही वाढवण्यात येणार आहे. दादर, माहीम, धारावी या जी-उत्तर विभागांमध्ये यापूर्वी तीन कृत्रिम तलाव होते. या वर्षी सात करण्यात आले आहेत.

पुण्यात घरगुती गणपतींचे घरीच विसर्जन
तर पुण्यातही ढोलपथकांच्या गजरात मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. अनेक घरगुती गणपतींचे विसर्जनही मोठ्या धुमधडाक्यात केले जाते. मात्र यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. यावर्षी घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा यावर्षी सेवक व्यस्ततेमुळे मनपाकडून केली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केलेय.

बातम्या आणखी आहेत...