आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझा वाढदिवस 14 जूनला आहे पण माझ्या वाढदिवशी भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली. कोरोनाच्या मृत पेशी सापडल्यामुळे माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली होती आता पुन्हा तुम्ही भेटायचला आल्यास कोरोनाची लागण झाली तर शस्त्रक्रिया आणखी पुढे ढकलेल आणि हा धोका मी पत्करु शकणार नाही, शस्त्रक्रिया होऊन बरे वाटल्यानंतर मी सर्वांशी भेटेल असे ट्विटच मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी आज केले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मध्यल्या काळात मी रुग्णालयात दाखल झालो; पण कोरोनाच्या मृत पेशी (डेड सेल्स) शरीरात सापडल्याने शस्त्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली. आता पुन्हा तोच प्रकार घडू नये म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचा 54 वा वाढदिवस
राज ठाकरे 14 जून रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी त्यांना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. त्यांना मनापासून शुभेच्छा देतात. मोठ्या थाटात त्यांचा वाढदिवस होतो. पण त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे.
ठाकरे घरात अलगीकरणात
राज ठाकरे म्हणाले, दहा दिवसांपासून मी कोविडच्या नियमांनुसार घरातच क्वॉरंटाईन आहे. त्यादरम्यानच माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरेही वाटते, पण, यावर्षी मला 14 तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. गाठीभेटीत परत संसर्ग झाल्यास मला परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागू शकते ती किती पुढे ढकलायची यालाही कालमर्यादा असते असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.