आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोप:कोरोना हा महाराष्ट्र सरकारसाठी पैसा मिळवण्याचा व्यवसाय झाला आहे, ऑडिओ क्लीप शेअर करत भाजपचा गंभीर आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान अनेक रुग्णांकडून उपचारांचे अव्वाच्या सव्वा बिलं आकारली जात आहे. असे असतानाच भाजपने महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. कोरोनाच्या माध्यमातून जनतेला लुटण्याचे धंदे सुरु आहेत असा आरोप विरोधकांनी राज्य सरकारवर केला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नितेश राणेंनी ट्विट करत म्हणाले की, मुंबईतील कुपर हॉस्पिटलच्या 2 डॉक्टरांमधील हा संवाद आहे. आम्ही वारंवार जे सांगत आहोत आता ते पुन्हा एकदा सत्य झालंय. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार पैसे कमविण्याचा धंदा करत आहे. असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ जोडला आहे. या व्हिडिओमध्ये दोन डॉक्टरांमधील संवाद ऐकायला मिळतोय.

या व्हिडिओमध्ये डॉक्टर म्हणत आहेत की, कोरोनाच्या नावाखाली आता धंदा सुरू करण्यात आला आहे. यासोबतच क्वारंटाईन सेंटर, कोविड सेंटर या माध्यमातून 25-30 कोटी रुपये खर्च करुन महापालिकेचा पैसा संपवला जात आहे. यासोबतच डीन कोविड सुविधा केंद्रात जातो, ते पाहून हे काय चाललंय? हा धंदा सुरु आहे. असं या ऑडिओ क्लिपमध्ये डॉक्टर बोलत आहेत. तसेच सरकारला कोरोना संपवायचा नाही. जर कोरोना संपला तर त्यांचा धंदा बंद होईल. कोरोना काळातही सरकार पैसे कमावत आहे. त्यांना जगाच्या अर्थकारणाशी देणेघेणे नाही. पैसा खर्च केला आहे तो आला पाहिजे असं राजकीय नेते वागत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचं दिसत आहे.