आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढती चिंता:कोरोना हॉटस्पॉटचे आता मुंबईबाहेर स्थलांतर; रुग्णांतही लक्षणीय वाढ, सत्ताधाऱ्यांत मतभेद

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेलमध्ये लाॅकडाऊन

मुंबईतला कोरोनाचा फैलाव आता मुंबईबाहेर म्हणजे महानगर क्षेत्रात (एमएमआर) पसरला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रात कडक टाळेबंदी (लाॅकडाऊन) लागू करण्यात आला आहे. मिशन बिगिन अगेनची घोषणा झाल्यानंतर पुन्हा टाळेबंदी लावल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

२४ मार्चपासून ३० मेपर्यंत मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदी होती. परिणामी अडीच महिने नागरिकांना घरात काढावे लागले. १ जूनपासून मिशन बिगिन अगेनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. त्यानंतर पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत लोकांना व्यायाम व इतर कामांसाठी बाहेर पडण्याची मुभा दिली होती.

मंत्र्यांमध्येच आहेत मतभेद

मुंबई महानगर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. याबाबत बोलताना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईच्या आसपासच्या परिसरात १५ ते २० टक्के कम्युनिटी स्प्रेड आहे. सरकार त्यावर काम करत आहे, असे सांगितले. तर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या टाळेबंदीचा कम्युनिटी ट्रान्समिशनशी संबंध जोडू नका. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, असा दावा केला आहे.

अनलाॅक १.० च्या काळात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले. परिणामी, मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना टाळेबंदी लावण्याची मोकळीक दिली. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील ४ महापालिकांनी टाळेबंदी लागू केली आहे. ३० मे रोजी मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर ३.६८ टक्के होता. तो १ जुलै रोजी १.६८ टक्के झाला. रुग्ण दुप्पट होण्याचा मुंबईचा मे महिन्याचा दर ११ दिवस होता, तो जुलैमध्ये ४२ दिवसांवर आला आहे. याचा अर्थ मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. त्याच वेळी मुंबई महानगर क्षेत्रात मात्र कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित पालिका आयुक्तांनी टाळेबंदीची घोषणा केली आहे. दरम्यान, या मुद्यावरून आणखी राजकारण पेटण्याची शक्यता असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

सत्ताधाऱ्यांत मतभेद

चार महापालिका क्षेत्रात पुकारलेल्या लाॅकडाऊनसंदर्भात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची तक्रार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. यासंदर्भात पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

४ पालिका क्षेत्रात लाॅकडाऊन

मीरा -भाईंदर पालिका क्षेत्रात २ ते १० जुलै, कल्याण-डोंबिवली व ठाणे महापलिका क्षेत्रात ३ ते १२ जुलै असा लाॅकडाऊन लावण्यात आला. पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ ते १४ जुलैपर्यंत लाॅकडाऊन असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser