आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona In Maharashtra Police Department | 4810 Policemen Were Corona Positive In The State, 59 Policemen Including 3 Police Officers Were Infected

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस विभागात कोरोना:मागील 24 तासांत 3 पोलिस अधिकाऱ्यांसह 59 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, राज्यात एकूण 4810 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांमध्ये 122 अधिकाऱ्यांचा समावेश, आतापर्यंत 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत 4810 पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मागील 24 तासांत 67 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान सध्या 1,097 पोलिस कर्मचारी अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात 1 लाख 70 हजाराच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

आतापर्यंत 122 पोलिस अधिकारी संक्रमित 

राज्यात आतापर्यंत 122 पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 3 अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यादरम्यान कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यासोबतच हे कुटुंब ज्या सरकारी निवासगृहात राहत होते, त्यांना तेथेच राहता येणार आहे. 

1 लाख 70 हजारच्या जवळ पोहचली संक्रमितांची संख्या 

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1.69,883 झाली आहे. सोमवारी राज्यात 181 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार यातील 78 मृत्यू मागील 48 तासांत तर 103 मृत्यू त्यायाआधी झाले होते. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 7,610 जणांचे प्राण गेले आहेत. तर 2,385 रुग्णांना रुग्णलयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात 88,960 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser