आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलात कोरोना:मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला कोरोना; गेल्या 24 तासांत 133 पोलिसांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाउनमध्ये आपले कर्तव्य बजावताना पोलिस कर्मचारी - फाइल फोटो - Divya Marathi
लॉकडाउनमध्ये आपले कर्तव्य बजावताना पोलिस कर्मचारी - फाइल फोटो
  • राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 87 पोलिसांचा मृत्यू, त्यात 7 अधिकारी तर 80 कर्मचाऱ्यांचा समावेश

राज्यात मागील 24 तासांत 133 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या पोलिसांत 19 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1489 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 124 अधिकारी आणि 1305 कर्मचारी आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 87 पोलिसांचा मृत्यू झाला आहे, त्यात 7 अधिकारी तर 80 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

मुंबई पोलिस मुख्यालयापर्यंत पोहोचला कोरोना 

वरिष्ठ रँकच्या एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मुंबई पोलिस मुख्यालयाने त्यांच्या ऑफिसला सॅनिटाइज केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नात सक्रिय होते. त्याच्या ड्रायव्हर आणि काही कर्मचार्‍यांना हा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी या आयपीएस अधिकाऱ्याने मंत्रालयात एका बैठकीत सहभाग घेतला होता. तेथे गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...