आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोलिस विभागात कोरोना:राज्यात 8 हजार 200 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी कोरोना बाधित; 7 अधिकाऱ्यांसह 93 पोलिसांचा मृत्यू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञान वापरावे : देशमुख

राज्यात शनिवारी दुपारपर्यंत एकूण 8,200 पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 7 अधिकाऱ्यांसह 93 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अधिकृत आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये कर्तव्याचे पालन करताना 8,200 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. यातील 6,314 पोलिस कर्मचारी बरे झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 214 अधिकाऱ्यांसह एकूण 11,627 पोलिस कर्मचाऱ्यांचा विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस विभागातील 93 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला. एकट्या मुंबई पोलिसांत 52 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञान वापरावे : देशमुख

शनिवारी पुण्यात आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. ते पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयीच्या बैठकीत बोलत होते. या दरम्यान त्यांनी गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी "एक्स्ट्राज" (ट्रॅकिंग ऑफ एक्सपीरियन्स) अ‍ॅप बद्दल माहिती दिली. पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘एक्स्ट्रा’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.