आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परीक्षा वाद:राजभवनात कोरोना...आता तरी यूजीसीला पटेल का? अंतिम वर्षाच्या परीक्षांवर उच्च शिक्षणमंत्र्यांचा सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा सर्व कठीण परिस्थितीत परीक्षा घेणं योग्य आहे का?

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज भवनापासून ते बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापर्यंत कोरोना पोहोचला आहे. आता तरी विद्यापीठ अनुदान आयोगाला पटेल का, असा प्रश्न उपस्थित करत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी हा सवाल केला आहे.

विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून वाद निर्माण असला तरी राज्य सरकार मात्र परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. राजभवनात कोरोना पोहोचला आहे. अमिताभ बच्चन देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.’ अशा सर्व कठीण परिस्थितीत परीक्षा घेणं योग्य आहे का? असा प्रश्न उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. अशा सर्व परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थांच्या आयुष्याशी खेळणे आहे. त्यामुळे आता तरी यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?’ असा थेट सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

0