आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट गंभीर:मुंबईत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट, धारावीत तिसरा मृत्यू; डॉक्टर, नर्स यांना लागण झाल्याने तीन हॉस्पिटल बंद

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ८२ वर्षीय आजी कोरोनामुक्त, मात करणारी राज्यातील सर्वात वृद्ध

मुंबईत उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टीमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून आता तर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने मुंबईकरांवरील संकट आणखी गंभीर झाले आहे. मुंबईत गुरुवारीही १०० च्या वर नवे कोरोनाग्रस्त सापडले आणि ९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या केईएममधील एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील डॉक्टर आणि नर्सच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबईतील तीन हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. सोमवारपासून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात येणार असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असलेल्या भागातील भाजीपाल्याची दुकानेही बंद केली जाणार आहेत.. धारावी झोपडपट्टीत गुरुवारी तिसऱ्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेसाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची बैठक झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन या योजनेअंतर्गत १५० डॉक्टर देणार असून दोन खासगी डॉक्टरांसोबत दोन मनपाचे डॉक्टर आणि एक सहायक अशी पाच जणांची टीम तयार करून त्यांच्या मदतीने धारावीतील साडेसात लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशनचा प्रयत्न करणार आहे.

ही रुग्णालये बंद

डॉक्टर, नर्स कोरोनाग्रस्त आढळल्याने भाटिया रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय बंद करण्यात आले असून आणि ब्रीच कँडी रुग्णालयातील ओपीडी आणि इतर सेवा बंद केल्या असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. जसलोक रुग्णालयही बंद करण्यात आले असून फक्त इमर्जन्सी आणि कोविड-१९ वॉर्ड सुरू ठेवण्यात येणार आहेत.

८२ वर्षीय आजी कोरोनामुक्त, मात करणारी राज्यातील सर्वात वृद्ध

कोरोनाच्या या काळात एक चांगली बातमीही समोर आली असून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक ८२ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी गुजरातहून मुंबईतील घरी परतली होती. तिची चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या महिलेला अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात सात दिवस ठेवण्यात आले. आता ती कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनावर मात करणारी राज्यातील ती सर्वात वृद्ध ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...