आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Maharashtra | Corona Update Maharashtra | Marathi News | 43 Thousand 211 New Corona infected Patients Were Registered, While 19 Died Due To Corona

राज्यात कोरोना:राज्यात आज 43 हजार 211 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात पुन्हा 43 हजाक 211 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात 33 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात रुग्ण वाढ होत असल्याचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण हा सध्या 94.28 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर हा 1.98 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात 228 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा देखील धोका वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 238 ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1605 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी सुमारे 859 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

मुंबईत 11 हजार 317 नव्या कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासात मुंबईत 11 हजार 318 नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्या 10 हजारांहून अधिक असल्याने धोका कायम आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 22 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 89 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 435 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...