आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्वारंटाइन सेंटरमध्ये छेड:कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत क्वारंटाइन सेंटरमध्ये काढली तरुणीची छेड, एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एक क्वारेंटाइन सेंटर . फाइल फोटो. - Divya Marathi
मुंबईतील एक क्वारेंटाइन सेंटर . फाइल फोटो.
  • तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारंटाइन सेंटरमध्ये बोलवले होते

मलाड परिसरातील जनकल्याण नगरमध्ये असलेल्या न्यू भूमी पार्क क्वारेंटाइन सेंटरमध्ये तरुणीसोबत कथित छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल करुन एकाला एटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे.

चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण 15 जूनचे आहे. मालाड पश्चिममधील एका तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारेंटाइन सेंटरमध्ये बोलवण्यात आले होते. तिथे तिला कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवसी घरी सोडले जाईल, असे सांगितले. त्यानंतर तरुणीला एका रुममध्ये एकट्यात गाठुन तिची छेड काढण्यात आली.

दुसऱ्या दिवशी तरुणीचे कुटुंबिय तिला घरी घेऊन गेले. यानंतर तरुणीने संपूर्ण प्रकरण आपल्या आईला सांगितले. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि 20 जूनला तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला न्यायालयात दाखल केले होते, त्याला एका दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. सध्या पोलिस दुसऱ्या एका आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...