आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 1576 नव्या रुग्णांची नोंद, तर49 रुग्णांचा मृत्यू; हॉटस्पॉट जिल्ह्यातील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी राज्यात एकाच दिवसात उच्चांकी 1602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, आज राज्यात तब्बल १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यात आज ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1068 झाला आहे. यासोबतच आज ५०५ रुग्ण ठीक झाले असून, राज्यात एकूण ६५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

गुरुवारी राज्यात एकाच दिवसात उच्चांकी १,६०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील रुग्णसंख्या २७ हजार ५२४ झाली आहे. गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू झाला. बळींचा आकडा १०१९ वर पोहोचला आहे. राज्यात गुरुवारी ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत.

यादरम्यान सरकारने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगावसारख्या हॉटस्पॉट परिसरामधील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार, या परिसरांमधील संक्रमित आणि मृत्यूमुळे हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेट बैठककीदरम्यान या परिसरातील लॉकडाउन वाढवण्यावर चर्चा झाली होती. याची अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री करतील. 

पुण्यात १६९ कोरोनाचे नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू; ५१ टक्के झाले बरे

दिवसाआड पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १६९ कोरोनाबाधित व्यक्ती सापडले आहेत, तर १०९ व्यक्ती ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३ हजारच्या जवळपास पोहोचली आहे. ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

आतापर्यंत पुणे शहरात २ हजार ९८७ बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्यातील १ हजार ४८६ व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात १ हजार ४१५ करोना संशयित व्यक्तीचे नमुने घेण्यात आले. तपासणीची संख्या वाढल्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येते. त्यामध्ये नायडू रूग्णालयात १३४ ससूनमध्ये ७ तर खासगी रुग्णालयात २२ जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १ हजार ३३२ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील नायडू आणि त्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये ९५३, ससूनमध्ये ११० आणि खासगी रुग्णालयात २६९ जणांवर उपचार सुरू आहते. तर ११६ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ३४ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महानगरापालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. तर, पिंपरी चिंचवड मध्ये पाच नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या १८३ पर्यंत पोहोचली आहे.

दीड हजारांवर रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

पुणे शहर व परिसरात मागील दाेन महिन्यांच्या कालावधीत काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली हाेती. मात्र, प्रथमच काेराेना रुग्णांची संख्या ही डिस्चार्ज रुग्णांपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण तीन हजार ३२५ काेराेना रुग्ण सापडले असून गुरुवारी १६९ रुग्णांची त्यात भर पडली. मात्र, पुणे परिसरातील १५३३ रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून एक हजार ६४१ रुग्णांवरच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

परभणी जिल्ह्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह

जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावातील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालय प्राप्त झाला. सि इस. डॉक्टर बाबासाहेब नागरगोजे यांनी या माहितीस दुजोरा दिला. मुंबईतून आपल्या मूळ गावी शेवटी येथे स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबातील तिघांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येलदरी येथील प्राथमिक रूग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्र दाखविण्यात आले होते . जिंतूर येथे येथे शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करून त्यांचे स्वब पाठविण्यात आले होते .त्याचे रिपोर्ट गुरुवारी रात्री उशिरा हाती लागले त्यात ते तिघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...