आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 1606 नव्या रुग्णांची नोंद, 67 जणांचा मृत्यू; रुग्णसंख्या 30 हजार पार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आतापर्यंत 1135 जणांचा मृत्यू तर 7088 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज विक्रमी 1606 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आज राज्यभरात 67 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत मृतांचा आकडा 1135 वर पोहोचला आहे. सुखद बाब म्हणजे 524 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील 7088 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

राज्यातील रिकव्हरी रेट 22 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत हा दर 25 टक्के आहे. येथे प्रत्येक चौथा रुग्ण बरा होत आहे. राज्यात 14 मेपर्यंत 27,524 प्रकरणे समोर आली आहेत. उपचारानंतर यातील 6,059 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईला लागून असलेल्या उपनगरामध्ये, मीरा-भाईंदरचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 60% आहे. उल्हासनगरमध्ये 81 रुग्णांपैकी केवळ 11 रुग्ण बरे झाले आहेत. 

देशातील पहिले ओपन हॉस्पिटल तयार 

मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावरील देशातील पहिले ओपन हॉस्पिटल तयार आहे. 1008 खाटांच्या या ओपन हॉस्पिटलमध्ये रूग्णांचे राहणे, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. रुग्णालयात नॉन क्रिटिकल संक्रमितांवर उपचार केले जातील.

वानखेडे स्टेडियम बनणार क्वारंटाईन सेंटर 

मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियमला ​​क्वारंटाइन सेंटर म्हणून तयार करीत आहे. बीएमसीकडून मिळालेल्या पत्रानंतर एमसीए अधिकारी यासाठी मंजुरी देणार आहेत. बीएमसी उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले की, या स्टेडियममध्ये 800 बेड्सचे क्वारंटाइन सेंटर उभारले जाईल. येथे ऑक्सिजन आणि इतर मेडिकल सुविधा उपलब्ध असतील.  वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाला आधीच क्वारंटाइन सेंटर बनवले आहे.

मास्क लावण्यास सांगितल्यामुळे पोलिसांवर प्राणघातक हल्ला 

अंटॉप हिल पोलिस ठाणे हद्दीत मास्क लावण्यास सांगितल्यावरून स्थानिक लोकांनी 4 पोलिस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एक पीएसआय आणि एसआरपीएफच्या दोन जवान आहेत. जखमी पोलिसांनी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी 17 आरोपींविरोधात गुन्ही दाखल करण्यात आला आहे. तसेच वसीम अहमद (22) आणि मो.अफजल खान (32) या दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे.  

250 बसगाड्यांना रुग्णवाहिकेत बदलणार

रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट असणाऱ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये यासाठी बीएमसीने 250 बस गाड्यांना रुग्णवाहिकेत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 50 बेस्ट बस आणि 200 मिनी बसचा समावेश आहे. यातील अर्ध्या बस गाड्या रुग्णवाहिकेत बदलल्या आहेत. 

कोरोनामुळे आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू 

57 वर्षीय मुंबई पोलिस अधिकाऱ्याचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी ट्विटर ही माहिती दिली. मधुकर माने असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मागील 15 दिवसांपासून रजेवर होते. राज्यात आतापर्यंत 10 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...