आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:शुक्रवारी 2,682 नवीन रुग्णांची नोंद, तर 116 रुग्णांचा मृत्यू; आज सर्वाधिक 8,391 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खर्च वाचवण्यासाठी राजभवनात येणाऱ्यांचे फुलांनी स्वागत होणार नाही
  • लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे 23 हजार लोकांना अटक

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज 2,682 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यासोबत एकूण आकडा 62,228 झाला आहे. तसेच, आज 116 रुग्णांच्या मृत्यूसोबत राज्यातील एकूण मृतांचा आकडा 2,098 झाला आहे. परंतू, यात चांगली बाब म्हणजे, राज्यात आज सर्वाधिक 8,381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, राज्यात आतापर्यंत 26,997 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात काल(दि.28) 2,598 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यातील 1,438 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. गुरुवारी कोरोनामुळे 85 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या प्रभावाला कमी करण्यासाठी 6 लाख 12 हजार 745 नागरिकांना घरात आणि 35 हजार 122 नागरिकांना इतर ठिकाणी क्वारेंटाइन करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 4 लाख 19 हजार 417 रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत.

साता-यात होईल ट्रूनेट तंत्रज्ञानाने चाचण्या

सातारा डिस्ट्रिक्ट सिविल हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या चाचण्यासाठी ट्रूनेट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ट्रूनेट टीबी परीक्षणासाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे, यात एका तासाच्या आत परिणाम दिसतो. यातून कोरोना रुग्णांची चाचणी एक किंवा दोन तासात होऊ शकेल. या तंत्रज्ञानाला गोव्याच्या मोल्बियो डायग्नोस्टिक्सने विकसित केले आहे.

2,095 पोलिस कर्मचारी संक्रमित, तर 22 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 22 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 130 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोना संक्रमित पोलिसांची संख्या 2,095 झाली आहे. संक्रमित पोलिसांपैकी 236 अधिकारी लेव्हलचे आणि 1,859 काँस्टेबल रँकचे कर्मचारी आहेत. या सर्वांचा विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच, आतापर्यंत 75 अधिकारी आणि 822 काँस्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

खर्च वाचवण्यासाठी राजभवनात येणाऱ्यांचे फुलांनी स्वागत होणार नाही

कोरोना संकट पाहता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. येथे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिला जाणाऱ्या बुकेचा खर्च कमी करण्यात आला आहे. राज्यपालांनी पुण्यातील राजभवनात दरवर्षी 15 ऑगस्ट होणारे कार्यक्रमही रद्द केले आहेत. राज्यपालांनी यापूर्वीच आपले एका महिन्यांचे वेतन पीएम केअर फंडात दिले आहे. तसेच, पुढील एका वर्षासाठी त्यांनी आपल्या वेतनातील 30 % देण्याची घोषणाही केली आहे.

लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे 23 हजार लोक अटक

पोलिसांवर हल्ला करण्याच्या 254 घटना घडल्या. याप्रकरणी आतापर्यंत 833 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये असामाजिक तत्वांनी 40 पेक्षा जास्त वेळेस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. लॉकडाउन उल्लंघनात 1 लाख 16 हजार 670 गुन्हे दाखल करण्यात आले. तर, याप्रकरणी 23 हजार 314 लोकांना अटक करण्यात आले.

महाराष्ट्रातून आता दररोज 50 फ्लाइटची मूवमेंट होत आहे

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)वरुन मागील दोन दिवसात 50 फ्लाइटची मूव्हमेंट झाली. यात 25 फ्लाइट डिपार्चर आणि 25 फ्लाइट एरायवल झाल्या. 5 एअरलाइंस कंपन्यांनी गुरुवारी देशातील 16 सेक्टरला मुंबई एअरपोर्टशी कनेक्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...