आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:महाराष्ट्रात कोरोनामुळे एक हजारपेक्षा अधिक मृत्यू, त्यातील 60% एकट्या मुंबईत; जगातील 198 देशांमध्ये यापेक्षा कमी रूग्णांचा जीव गेला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी येथे 30 पेक्षा अधिक जणांना मृत्यू
  • तज्ञांची भीती - ...तर धारावीत जगातील सर्वात भयानक विनाश होईल
  • केवळ एप्रिल - मे मध्ये 98% पेक्षा जास्त मृत्यू झाले, गेल्या 11 दिवसांपासून मृत्यूच्या आलेखात वाढ

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी एक हजारांच्या पुढे गेली. मुंबई कोरोनाचा केंद्रबिंदू बनली आहे, येथे राज्यातील 60% मृत्यू झाले. जगातील 198 देशांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून महाराष्ट्रात परिस्थिती कशी बिघडत चालली याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या 198 देशांमध्ये इस्त्राइल, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांचा समावेश आहे. 

यातील पाकिस्तान असा देश आहे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात 11 कोटी तर पाकिस्तानात 22 कोटी लोक राहतात. जागतिक कोरोना मीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील 213 देश आणि आयलँड कोरोनाने प्रभावित झाले आहेत. यापैकी, अशी 23 देशे आहेत जिथे कोरोनामुळे महाराष्ट्रपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 

एप्रिल आणि मे मध्ये 98% मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळला होता. तर 17 मार्च रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. कोरोनामुळे राज्यात 31 मार्चपर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 302 प्रकरणे समोर आली होती. यानंतर कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगाने पसरला की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे मृत्यू आणि संसर्ग असलेले राज्य बनले. देशातील एकूण प्रकरणांपैकी 32% प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. तसेच 38% मृत्यू देखील याच राज्यात झाले. मे मध्ये मृत्यूंचा एक नवीन ट्रेंड दिसून आला.  आता येथे दररोज 50 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. 

तज्ज्ञ म्हणाले- धारावीमध्ये जगातील सर्वात जास्त विध्वंस होण्याचा धोका

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. जर येथे शक्य तितक्या लवकर संसर्ग नियंत्रित झाला नाही तर जगातील सर्वात भयानक आपत्ती येथे येऊ शकते, अशी चिंता जगातील मोठ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि इबोलासाठी काम करणार्‍या कृतिका कपाल्ली यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी ट्वीट केले होते की, "गेल्या अनेक महिन्यांपासून मला याची चिंता होती.  भारतातील लोकसंख्या आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने रहात असलेल्या लोकांमुळे ही चिंता साहाजिकच आहे. येथे कोरोना वणव्यासारखा पसरू शकतो आणि अकल्पनीय मृत्यू आणि विनाश आणू शकतो."

2.6 चौरस किलोमीटरमध्ये राहतात 10 लाख लोक 

जगातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये सुमारे 2.6 चौरस किलोमीटर क्षेत्रात 10 लाख लोक राहतात. येथे 10 बाय 10 फूटाची खोली 8 ते 10 लोकांचे घर असते. 73 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. एखाद्या शौचालयात 40 तर कुठे 12 आणि 20 जागा असतात. दररोज सुमारे 60 ते 70 लोक एक सीट वापरतात, म्हणजेच एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक सार्वजनिक शौचालय वापरतात. 

बातम्या आणखी आहेत...